---Advertisement---

लेकीच्या लग्नात आमीरने केला सुपरहिट डान्स !

By team
On: January 4, 2024 10:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त सुरु झाला असून आता बॉलिवूडचा मिस्टर ‘परफेक्शनिस्ट’ आमिर खानची लेक आयरा खान दि. ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने मुंबईतल्या बांद्रामधील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवाराने हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव या दोघांचाही एक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्याही लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर सुधा अजमेरा नावाच्या एका युजरने एक व्हिडीओ शेअर केला.
शेअर केलेल्या ह्या व्हिडीओमध्ये काही महिला गाणं गाताना दिसत आहे. आणि त्यांच्या गाण्यावर अभिनेता आमिर खान, त्याची एक्स पत्नी किरण राव आणि काही कुटुंबीय एकत्रित डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्यांचा मुलगा आझादही उपस्थित होता. खान कुटुंबीयांचा हा हटके डान्सचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. आयराने लाइट पिंक कलरचा शरारा परिधान केला होता. नववधूच्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. मुलीच्या लग्नात आमिर खानचा लूक देखील जबरदस्त होता. आमिर खानने व्हाइट कलरचा कुर्ता, धोतर आणि डोक्यावर पिंक कलरचा फेटा घालला होता. तर एक्स वाईफ किरण रावने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला होता. येत्या ८ जानेवारीला उदयपूरमध्ये महाराष्ट्रीयन परंपरेनुसार सप्तपदी घेत लग्नगाठ बांधणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!