---Advertisement---

तवावाला बाबा पुन्हा चर्चेत : महिला भाविकेचा बनवला ‘तो’ व्हिडीओ

By team
On: January 29, 2024 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापूर्वी राज्यात गरम तव्यावर बसण्याचा दावा करणारा गुरुदास बाबा ऊर्फ सुनील कावलकर मोठ्या चर्चेत आले होते पण सध्या ते अडचणीत आले आहे. एका महिलेच्या असह्यतेचा त्याने फायदा घेतल्याचं समोर आलं आहे. महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा या बाबावर आरोप आहे. या बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर तवावाला बाबा गायब झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणाने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महिला भाविकेचे शोषण करून व्हिडिओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या महिलेचा नवरा आजारी असतो. तिच्या नवऱ्याचा आजार बरा करण्यासाठी तव्यावाला बाबाने तिला मध्यप्रदेशातून अमरावतीच्या आश्रमात राहायला बोलावलं. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ काढला असा आरोप या महिलेने केला आहे.

या प्रकरणी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार गुरुदास बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. काही महिन्यापूर्वी याच बाबाचा तापत्या ताव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हा बाबा अचानक चर्चेत आला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!