---Advertisement---

दोघांनी केला तरुणीवर सामुहीत अत्याचार : पुण्यात खळबळ

By team
On: January 31, 2024 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना विद्येची नगरी असलेल्या पुण्यातील हडपसर परिसरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग आणि गणेश अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित तरुणीचे मित्र होते. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून आरोपींनी दुचाकीवरून तरुणीला मांजरी येथील निर्जनस्थळी नेलं.
रात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला नदीपात्रातच सोडून दिलं. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!