---Advertisement---

अखेर महाविकास आघाडीचं ठरलं : ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर

By team
On: April 9, 2024 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमधून शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे.

Watch Our Latest Video

महाविकास आघाडीचे संपूर्ण जागा वाटप…
काँग्रेसच्या जागा: नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट- बारामती, शिरूर, सातारा, दिंडोरी, माढा,रावेर, अहमदनगर, बीड, वर्धा, भिवंडी, या १० जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे.

ठाकरे गट: बुलढाणा, यवतमाळ, मावळ, सांगली, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, कल्याण, हातकणंगले, पालघर, जळगाव, अशा २१ जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!