अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहर व तालुक्यात ईदऊल फितर अर्थात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ईदच्या या पवित्र दिवशी आपल्या देशातील सामाजिक सलोखा, बंधुभाव, एकमेकांच्या धर्माबद्दल प्रेम,अधिकाधिक वृद्धिगत व्हावा, अशी प्रार्थना ही करण्यात आली.
Watch Our Latest Video
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी अक्कलकोटच्या शाही ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले.यावेळी नमाज पठनानंतर एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या.
अक्कलकोट ईदगाह कमिटीकडून नमाज पठण करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना पाण्याची व्यवस्था,पिण्यासाठी पाण्याचे बॉटल,नमाज पठनासाठी उत्तम चटाया अंथरण्यात आले होते.वयोवृद्ध लोकांना नमाज पठण करण्यासाठी सावलीची व खुर्च्यांची सोय करण्यात आली होती.सर्व सोय ईदगाह कमिटीकडून करण्यात आली होती.
ईदऊल फितर अर्थात रमजान ईदची नमाज पठण झाल्यावर ईदगाह येथे विविध राजकीय व सामाजिक नेते मंडळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,जेष्ठ नेते अशपाक बळोरगी,रईस टिनवाला,एजाज मुतवल्ली,महेश हिंडोळे, दिलिप सिद्धे, सद्दाम शेरिकर,ननु कोरबु,मैनोदीन कोरबु,अविनाश मडीखांबे, वकील बागवान, रजाक सय्यद,अलिबाशा अत्तार,अकील बागवान,सलीम यळसंगी,हारून जमादार, मोशीन मोकाशी,सोहेल फरास, रशिद खिस्तके आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.










