---Advertisement---

बापाची क्रूरता : तीन मुलांना विहीरीत फेकून मारले

By team
On: April 15, 2024 3:28 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील झोडेगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भावंडांचे मृतदेह विहिरीत रविवारी सायंकाळी ६.३० वाजता‎ आढळून आले आहे. शुभम संतोष ‎‎ताकवाले, अमृता संतोष ताकवाले, शिवानी संतोष ताकवाले अशी मृत भावडांची नावे आहेत. ‎‎वडिलांनीच या तिन्ही भावंडांना विहिरीत ढकलून ‎‎मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेतील संशयित संतोष ताकवाले हा डोमेगाव ‎येथील रहिवासी आहे. पोलिसांना माहिती मिळताच ‎विहिरीतून मृतदेह बाहेर काढून अंबड येथील ‎रुग्णालयात आणले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांना पित्याने विहिरीत ‎का ढकलले याबाबतचा तपास सुरु आहे.‎ ‎‎विशेष म्हणजे संशयिताने या घटनेची माहिती ‎पोलिसांना कळवल्यानंतर तो मुंबईला पळून जात‎ होता. त्याला संभाजीनगरात पोलिसांनी रात्री ११ ‎वाजता अटक केली. घटनेला कौटुंबिक वादाची‎किनार आहे.‎

कौटुंबिक वादातून वडिलानेच तिन्ही‎मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांचा‎खून केला आहे. घटनेनंतर संशयित‎पसार झाला होता , लागलीच‎पोलिस पथक त्याच्या मागावर होते,‎ अशी माहिती अंबड ठाण्याचे‎पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण‎यांनी दिली. या घटनेत आणखी‎कुणाचा सहभाग आहे, याचाही ‎पोलिस शोध घेत आहेत.‎ संशयिताचे शेवटचे मोबाइल‎लोकेशन आणि सध्याचे लोकेशन‎या आधारे पोलिस त्याचा शोध घेत‎होते. संशयित वारंवार आपले ‎ठिकाण बदलत असल्याचे तपासात‎समोर आले आहे. संभाजीनगरातील‎ जालना रोडवरील बाबा पेट्रोल पंप‎परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो ‎मुंबईला जाण्याच्या बेतात होता,‎ असे निरीक्षक नाचण म्हणाले.‎

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!