अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा,गांधीनगर तांडा , म्हेत्रे तांडा एक व दोन असे बंजारा समाजातील एकशे ऐंशी लोकांनी एकत्रित तिर्थ यात्रा
करून परतले आहेत.या प्रवासामध्ये बंजारा समाजाची काशी पोहोरा देवी , अयोध्या , मथुरा , प्रयागराज , ओंकारेस्वर , आग्रा , उज्जैन , त्र्यंबकेश्वर , शिर्डी इत्यादी ठिकाणी जाऊन दर्शन घेत धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
सदर तिर्थ यात्रा पंधरा दिवसाची आयोजित करण्यात आली होती . या प्रवासात दोन लक्झरी बस आणि सहा चार चाकी आणि एक गाडी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून पाठविण्यात आली होती . या पंधरा दिवसाच्या प्रवासात एकुण पाच हजार किलोमीटर प्रवास करून प्रवास सुखकर व यशस्वी रित्या पार पडली . हि तिर्थ यात्रा शिवाजी नगर तांडा येथील मोरया कंस्ट्रक्शनचे अशोक राठोड यांनी आयोजित केली होती . सदर तिर्थ यात्रा यशस्वी करण्यासाठी पोमू राठोड , लोकेश राठोड , अविनाश राठोड , रामू चव्हाण , हुसेन जाधव , मुकिंद राठोड , सुनिल राठोड , दिलीप राठोड , शिवाजी चव्हाण , शिवा राठोड , बंटी पवार , राजू पवार , संतोष राठोड , कांतू चव्हाण , आकाश राठोड आदींनी परिश्रम घेतले . दुधनी येथील समाजसेवक भिमाशंकर अंदेनी व अनेक दानशुर व्यक्तीनी अयोध्या येथे बंजारा समाजातील लोकांना अन्नदान केले .अनेक दिवसापासून माझ्या आई वडीलांना तिर्थ यात्रा घडवावी म्हणून प्रयत्न करीत होतो . यात तांड्यातील जेष्ट , नायक , कारभारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी होकार दिला . अशाप्रकारे तिर्थ यात्रा घडवून आणलो याचा मला सार्थ अभिमान आहे,असे अशोक राठोड यांनी सांगितले.