---Advertisement---

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान ; अक्कलकोट भाजपतर्फे जल्लोष

By team
On: June 10, 2024 1:00 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आल्याबद्दल आणि पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल अक्कलकोट शहर आणि तालुका भाजपतर्फे रविवारी एकच जल्लोष करण्यात आला.मोदी यांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतल्यानंतर बस स्टँड परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि मोदी यांच्या विजयाची खून दाखवत जयघोष केला. यावेळी पेढे आणि बुंदी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यानंतर अक्कलकोट भाजपा कार्यालयाच्या पुढे देखील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी जल्लोष करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की,देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे.देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे.

देशाने पुन्हा एकदा भाजपवर मोठा विश्वास दाखवलेला आहे.विकासाचे हे चक्र यापुढेही सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातूनही अनेक मान्यवरांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करत समाधान व्यक्त केले.देशात मोदी शिवाय पर्याय नाही असे आम्ही पूर्वीपासूनच म्हणत होतो आणि पुन्हा एकदा देशवासीयांनी देखील ते दाखवून दिले.याबद्दल आम्ही समाधानी आहोत,असे शहराध्यक्ष जोजन यांनी सांगितले. भाजपने केवळ विकास कामांच्या जोरावर सत्ता मिळवलेली आहे या पुढच्या काळातही इतर गोष्टींबाबतही चिंतन करून पुन्हा एकदा विधानसभेत भाजपला बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, असे तालुकाध्यक्ष राठोड यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी,यशवंत धोंगडे,महेश हिंडोळे,विलास गव्हाणे,अंकुश चौगुले,केदार माळशेट्टी,बाळा शिंदे,आप्पासाहेब पाटील,अप्पू बिराजदार,राजू बंदीछोडे,प्रवीण शहा,दयानंद बिडवे,प्रभाकर मजगे,बंटी राठोड,नागराज कुंभार,नन्नू कोरबू,राहुल ढोबळे,सुनील गवंडी आदींसह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!