---Advertisement---

ठाकरेंच्या नेत्याच्या गाडीच्या अनोळखीनी फोडल्या काचा

By team
On: June 20, 2024 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला केला. यावेळी मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी देखील बाळा कोकणे यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांची गाडी फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!