---Advertisement---

सरकारने बोलविली बैठक : दुधावर निघणार तोडगा !

By team
On: June 27, 2024 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

दूध दरवाढी संदर्भात सरकारकडून दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार (दि.२९) विधानभवनात बोलावण्यात आली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

या बैठकीला राज्यातील खासगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल व या बैठकीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्त मोहोड यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!