---Advertisement---

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात वारी करिअरची उपक्रमाचा शुभारंभ

By team
On: July 12, 2024 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट: प्रतिनिधी

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात वारी करिअरची उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ड्रीम फाउंडेशन सोलापूर व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वाचन, चिंतन, मनन करावे या भूमिकेतून ही करिअर वारी काढण्यात आली.

या उपक्रमाचा शुभारंभ संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भातगुणकी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, रा से यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ बाळासाहेब पाटील, प्रा तुकाराम सुरवसे, प्रा डॉ शितल झिंगाडे, प्रा मधुबाला लोणारी, प्रा मनीषा शिंदे, प्रा विद्याश्री वाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी झाले पाहिजेत त्यासाठी अफाट वाचन आवश्यक असते. वारी करिअरची याचा उद्देश देखील हाच आहे. विद्यार्थ्यांचे ग्रंथ मित्र असतात म्हणून ग्रंथाचे वाचन करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे.

ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भातगुणकी म्हणाले की 17 जुलै पर्यंत वारी करिअरची पालखी 55 शाळेमधून जाणार आहे. पालखीमध्ये संविधान, शिवचरित्र, ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा आदी ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रबोधन करणे हा या वारी पाठीमागील हेतू असेल माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे, स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, उच्च पदावर आरुढ झाले पाहिजे असे मत काशिनाथ भतगुणकी यानी यावेळी व्यक्त केले. उपक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिगंबर जगताप यांनी केले आभार राजशेखर पवार यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!