ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट राष्ट्रवादीच्या शिबिरात ९१ जणांचे रक्तदान; आमदार पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

 

अक्कलकोट, दि १३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहेत ही बाब गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असून असे महान कर्तुत्वान नेते महाराष्ट्राला लाभणे ही बाब गौरवास्पद आहे,असे प्रतिपादन आमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केले.
रविवारी,अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.त्या शिबिराचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.या शिबिरात ९१ जणांनी रक्तदान केले.शरद पवार एक राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत.त्यांच्यामुळे आज आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणून फिरत आहेत.हे जादू फक्त पवार यांच्याकडेच आहे.त्यांच्यामुळे आज सरकार बदलले आहे.येत्या काळात राष्ट्रवादीला आणखी चांगले दिवस येणार हे नक्की,असे ते म्हणाले.यावेळी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना स्वतः आमदार पाटील यांनी रक्तदान करून तरुणांसासमोर आदर्श ठेवला.या शिबिराचे आयोजक दिलीप सिद्धे युवा मंच व राष्ट्रवादी परिवार यांचे त्यांनी नियोजनाबद्दल कौतुक केले.रक्तदान एक श्रेष्ठ दान
आहे हे सर्वांनी केले पाहिजे.आपल्यामुळे जर एकाचा जीव वाचत असेल तर ते महान काम आपण आयुष्यात येऊन एकदा तरी केले पाहिजे,असे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी सांगितले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी भेट देऊन अक्कलकोट राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.यावेळी
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम,कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,विक्रांत पिसे,अविराज सिद्धे,शंकर पाटील,शिवराज स्वामी,आबा सोमवंशी, मोनू सुतार, सागर सोमवंशी, सागर शिंदे, श्रीशैल चितली, सौरभ लांडगे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!