---Advertisement---

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ आव्हाळे यांची बदली तर कुलदीप जंगम असणार नवे सीईओ

By team
On: August 29, 2024 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  प्रतिनिधी

राज्यात आगामी विधानसभा निवडणुक येवून ठेपली असतांना आज दि.२९ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली आहे. भाप्रसे कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात झाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी 21 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला होता. त्यांचा सुद्धा केवळ 13 महिन्याच्या अल्प कार्यकाळ राहिला आहे. आव्हाळे यांच्या काळात मुख्यालय दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर भर देण्यात आला. यापूर्वी आव्हाळे यांनी उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन या पदावर दोन वर्ष कार्यभार पाहिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोलापूर जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!