---Advertisement---

सर्जेराव जाधव जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये शुक्रवारी कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२३ : थोर समाजसेवक कै.सर्जेराव जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या (शुक्रवारी) २५ डिसेंबर रोजी अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शरद फुटाणे यांनी दिली.फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात सकाळी
१० वाजता कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष एस.ए.फुटाणे,प्रमुख विश्वस्त एस.एन.फडतरे,एस.बी.पवार,
एस. एम. पाटील,एम.पी.चव्हाण, परितोष जाधव,माधुरी जाधव,संतोष जाधव यांच्यासह फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी कै.जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन,तालुक्यातील गोर गरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय, शैक्षणिक आर्थिक मदतीच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहेत.तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

सदैव मदतीचे
कार्य

गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे हे कार्य अविरतपणे चालू आहे.यावर्षी काही निवडक गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.सर्जेराव जाधव ट्रस्ट आणि विमलाबाई जाधव न्यासतर्फे दरवर्षी हे कार्यक्रम घेण्यात येतात.

शरद फुटाणे,अध्यक्ष

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!