मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त उद्या हन्नुर येथे विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या
चौथ्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती के.बी.प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विश्वनाथ भरमशेट्टी यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत हन्नुर येथील महादेव देवालयात सिध्देश्वर ब्लड बँक व आश्विनी ब्लड बॅकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक रक्तदात्याना प्रतिष्ठानच्या वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाप्रसादाची व्यवस्था असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.याप्रसंगी राजकुमार भरमशेट्टी,नन्हेगावचे सरपंच सिध्दार्थ गायकवाड, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, दिलीप बिराजदार,तुकाराम बिराजदार आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हन्नुर ग्रामस्थांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment