अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थान यात्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या यात्रेला सुरुवात होत असते. यानिमित्ताने रविवार रोजी गुढीपाडवा सकाळी ८ वाजता पंचांग पठण नंतर पालखी उत्सव कार्यक्रम पार पडला.यावेळी भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय दि.६ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दहीहंडी उत्सव व पालखी मिरवणूक व गंगशितळ व रात्री १० वाजता कन्नड सामाजिक नाटक सादर होणार आहे.९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्ती व रात्री १० वाजता पुन्हा कन्नड
नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता मुख्य हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान पंचकमिटी व सर्व विश्वस्तांनी केले आहे.