---Advertisement---

‘या’ कारणांमुळे हंजगीत फेरनिवडणूक लागणार !

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या पासून गावकरी एकत्रित येऊन गाव बिनविरोध काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होता.वारंवार गाव बैठक घेऊन सर्वानुमते गावात निवडणुक न लावण्याचा एकमुखी निर्णय झाला होता.गाव बिनविरोध काढण्याला गावातीलच बहुसंख्य गावकर्‍यांचा प्रतिसाद ही मिळत होता.यंदा पहिल्यांदाच गाव बिनविरोध होत असल्याने या ऐतिहासिक निर्णयाचा गावपातळीवर स्वागत होत होते.
परंतु अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना गावातीलच काही तरुणांनी गाव बिनविरोध काढण्याच्या निर्णयाला विरोध करीत अर्ज दाखल केले होते. तेव्हा पासून गावातील प्रमुखांनी गावपातळीवर सतत बैठका घेऊन विरोधात भरलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालू होता.विरोधात भरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी गाव प्रमुखांनी रात्रंदिवस सतत विनवणी करत होते.परंतु या कामात गाव प्रमुखांना यश येताना दिसत नव्हते.म्हणून गावातील प्रमुखांनी नाराज होऊन अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी गावपातळीवर एक बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात आला. निवडणूकीसाठी उभे केलेल्या आठ ही उमेदवारांना अर्ज माघार घेण्यास सांगण्यात आले.या गाव प्रमुखांचा निर्णय अंतिम मानत शेवटच्या दिवशी आठ ही उमेदवार अर्ज माघार घेतले. हे पाहून विरोधात भरलेल्या तिन्ही प्रभागातून आठ उमेदवार आम्हीच गावकर्‍यांच्या विरोधात का जायचे म्हणुन शेवटच्या दिवशी काही ठराविक वेळेच्या अंतराने अर्ज माघार घेतला.आता हंजगी ग्रामपंचायत निवडणूकीतील तिन्ही प्रभागा मधून सर्वच्या सर्व सोहळा उमेदवार माघार घेतल्याने तालूक्यात अश्चर्य व्यक्त केला जात आहे.एक तर कोरोना महामारीमुळे हंजगी ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमी होत असल्याने तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आली होती.आता हंजगी ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेतील सर्वच्या सर्व उमेदवार माघार घेतल्याने हंजगी ग्रामपंचायतीत पुन्हा फेर निवडणूक लागण्याची शक्यता वाढली आहे.गाव करील ते राव काय करील या उक्ती प्रमाणे गावकर्‍यांनी ज्या प्रकारे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा जसा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता.आता त्याच प्रकारे ग्रामपंचायत निवडणूकीतील सर्वच्या सर्व उमेदवार माघार घेऊन हंजगी गावकर्‍यांनी पुन्हा एकदा प्रशासना समोर फेर निवडणुकीचे संकट उभे केले आहे.तालुक्यात एकूण 72 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती.अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातून नऊ गावे बिनविरोध तर 63 गावात निवडणुका लागल्या आहेत.तालुक्यातील एकमेव
हंजगी ग्रामपंचायतीत मात्र निवडणूकीतील सर्वच्या सर्व उमेदवार हे माघार घेतल्याने सध्या तिन्ही प्रभाग रिक्त राहिल्या आहेत.

निवडणूक आयोगाला
कळणार

अर्ज माघार घेण्याच्या दिवशी हंजगी ग्रामपंचायत निवडणूकीतील सर्वच्या सर्व उमेदवार माघार घेतल्याने सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत.या विषयी निवडणूक आयोगाना कळवून फेर निवडणूका घेण्यात येईल.

अंजली मरोड,तहसीलदार

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!