---Advertisement---

इस्माईल मुर्डी यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती

By team
On: July 2, 2025 1:47 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

महाराष्ट्र मुस्लिम आघाडीत संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सक्रिय सामाजिक संघटनेतून सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मुर्डी (अक्कलकोट )यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. संघटनेच्या विस्तार आणि प्रभावी कार्यप्रणालीसाठी विविध पदांवर नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्याअंतर्गत परमेश्वर गुमटे यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, यशवंत कोरे यांची सोलापूर जिल्हा सचिव आणि गंगाराम माळी यांची सोलापूर जिल्हा मोटार वाहन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या वेळी फ्रंटच्या कोअर कमिटी सदस्यांमध्ये मुश्ताक झिक्रे, हमीद काझी, अस्लम खान, राज्य उपाध्यक्ष सैफान मुजावर, सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाबुद्दीन नदाफ, सरताज नदाफ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्यात नवचैतन्य येईल आणि समाजहितासाठी अधिक व्यापक पातळीवर कार्य करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!