---Advertisement---

भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा दणदणीत विजय

On: January 18, 2021 4:35 PM
Follow Us:
---Advertisement---

अकलूज : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. तर, एकजागा बिनविरोध झाली आहे.

अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी थेट लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजप विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.

तिकडे, माळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी हाती आलेल्या निकालानुसार, 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!