---Advertisement---

चपळगाव ग्रामपंचायत निवडणूकीत पाटील-भंडारकवठे-बाणेगाव-पटेल गटाचे निर्विवाद वर्चस्व

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि. २०: संपुर्ण अक्कलकोट तालूक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चपळगाव ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून ग्रामविकास पॅनलचे तेरापैकी बारा उमेदवार निवडून आले आहेत.उद्योजक उमेश पाटील नेतृत्वाखालील सिध्दाराम भंडारकवठे व बसवराज बाणेगांव,आप्पासाहेब पाटील,रियाज पटेल यांच्या पॅनलने विरोधकांची दाणादाण उडविली.चपळगाव ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी यापूर्वीच पाटील-बाणेगांव-भंडारकवठे-पटेल गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत पाटील-भंडारकवठे-बाणेगाव विरोधक असलेल्या शाकीर पटेल,महादेव वाले व संजय बाणेगांव यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला.एक उमेदवार निवडून आला आहे.निवडीनंतर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना घेऊन पॅनलप्रमुखांनी घरोघरी जात मतदारांचे आभार मानले.ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी अप्पासाहेब पाटील,महेश पाटील,रियाज पटेल,अभिजीत पाटील,पांडूरंग चव्हाण,अंबणप्पा भंगे,
प्रभाकर हंजगे,डाॅ.काशिनाथ उटगे,श्रावण गजधाने,नितीन शिवशरण,अर्जून आगावणे,सुरेश नारायणकर आदींनी परिश्रम घेतले.विशेष म्हणजे ग्रामविकास पॅनलचे बहुतांश विजयी उमेदवार दोनशे मताधिक्याने निवडून आले असून आता सरपंच निवडीकडे संपूर्ण गावचे
लक्ष लागले आहे.

निवडून आलेले सदस्य-

वार्ड क्रं एक- सुवर्णा गणपती कोळी,वर्षा सिध्दाराम भंडारकवठे.

वार्ड दोन- वंदना विलास कांबळे, रेश्मा महिबूब तांबोळी, अपर्णा सुर्यकांत बाणेगाव.

वार्ड तीन- उमेश कुमारप्पा पाटील

वार्ड चार- चित्रकला वामन कांबळे, स्वामीनाथ जाधव(अपक्ष )

वार्ड पाच- गंगाबाई परमेश्वर वाले,श्रावण सिद्राम गजधाने.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!