---Advertisement---

अभिनेत्री करीना कपूर झाली व्यक्त : माझी मुलं फक्त हुशार नकोत तर….!

By team
On: December 7, 2025 4:49 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिने आता पुन्हा एकदा एक विधान केले आहे. ती अनेकदा पालकत्वाच्या टिप्स सोशल मीडियावरून शेअर करत असते. आता तिने मुलांसाठी सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. खरंतर करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेकदा स्वतःचे फोटो आणि मजेदार मीम्स शेअर करते असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. करीनाने पुन्हा एकदा तिच्या मुलांबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.

करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये करीनाने लिहिले की, मला माझी मुले फक्त हुशार असावीत असे वाटत नाही. मला त्यांनी दयाळू असावे असे वाटते. कारण ग्रेड घसरतात, नोकऱ्या बदलतात, ट्रॉफी धूळ पडतात पण चारित्र्य? ते कायमचेसोबत असते, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने अशा भावना पोस्टमधून शेअर केल्या आहेत. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

करीनाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नुकतीच नेटफ्लिक्सवरील “डायनिंग विथ द कपूर्स” या माहितीपटात ती दिसली. हा माहितीपट कपूर कुटुंबावर आधारित असून, कपूर कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक यात दाखविण्यात आले आहेत. करीना मेघना गुलजार दिग्दर्शित “दारा” या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय तिचे काही चित्रपटही अॅानफ्लोअर असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!