---Advertisement---

अधिवेशनात खळबळ : आमदाराच्या पैशांच्या गड्ड्यांचा व्हिडिओ; दानवे यांचा सरकारवर थेट आरोप !

By team
On: December 9, 2025 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भल्या मोठ्या रोख पैशांच्या गड्यांसह दिसत असून, तो व्यक्ती आमदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.

दानवे यांनी म्हटले की, “या सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण काही आमदारांकडे रोख रक्कमेचे ढीग आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांनी जनतेला सांगावे, हा आमदार कोण आणि एवढ्या पैशांसह तो काय करत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

नागपूरात अधिवेशन सुरू असताना उघड झालेल्या या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दानवे यांनी व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे आवाहन करत “काही आमदार पैशांच्या गड्ड्यांसह राजकीय बंदोबस्त करत आहेत,” असा आरोप केला. त्यांच्या या दाव्यांमुळे विधानभवनात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणाचा तपास होणार की नाही, याबाबत सर्वांचे लक्ष लागले असून, व्हिडिओतील व्यक्ती खरोखरच आमदार आहे का, याबाबतही स्पष्टता येणे गरजेचे आहे. मात्र, या आरोपांमुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढणार इतकेच निश्चित आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!