---Advertisement---

पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा? निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

On: January 23, 2021 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकताच तुम्ही लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा परवानगी मिळाल्यानंतर मी लस घेईन, असे अजित पवार यांनी सांगितले होते. दरम्यान, अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक शैलीत ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे.


 नक्की काय म्हणाले अजित दादा –

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!