अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कर्नाटक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक प्रसन्नकुमार, राष्ट्रीय सचिव सुशीलकुमार पाल, गोविंद शुरनूर, बाळकृष्ण लेंगरे,कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष धर्मण्णा तोंटापूर, राज्य सचिव अनिल पुजारी, विजयपूर जिल्हा अध्यक्ष गोविंद शिंदे, बेळगाव विभाग उपाध्यक्ष बसवराज कंकणवाडी, कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष देवेंद्र चलगेरी, उपाध्यक्ष एस.एम.पुजारी,सांगलीचे युवा नेते अजितकुमार पाटील, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते. सदरच्या निवडीप्रसंगी बोलताना जानकर म्हणाले की,बंडगर यांनी गेल्या दहा बारा वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे.
पक्षाची बांधणी मजबूत करुन संघटन वाढविण्याचे काम उत्कृष्टपणे केल्याबद्दल बंडगर यांना उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे सांगितले. बंडगर यांनी आता कर्नाटक राज्यात पक्षाची संघटना मजबूत बांधणी करुन येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दाखवून आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन जानकर यांनी केले. निवडीनंतर बोलताना सुनिल बंडगर यांनी माझ्याकडे उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करुन पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही,असे अभिवचन जानकर यांना बंडगर यांनी दिले.