---Advertisement---

तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये सोमवारी विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोटचे जनसेवक स्व. आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी दिली. दरवर्षी तानवडे
यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात.यावर्षी देखील कोरोनाची योग्य ती खबरदारी घेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत शिरवळ (ता.अक्कलकोट )येथील ग्रामपंचायत बहुउद्देशीय मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.याच दिवशी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत तानवडे शॉपिंग सेंटर अक्कलकोट येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या उपक्रमास डॉ.अश्विनी श्रीकांत अभिवंत यांचे सहकार्य मिळत आहे.त्याशिवाय सायंकाळी पाच वाजता शिरवळ येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळा पार पडणार आहे.हा कार्यक्रम सोलापूरच्या एम. के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.या कार्यक्रमास ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पोलीस निरीक्षक कल्लापा पुजारी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे,जेष्ठ नेते दत्ताअण्णा तानवडे, शिरवळचे सरपंच बसवराज तानवडे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. जनसेवक आमदार बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!