---Advertisement---

भाजपला धक्का ; शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

On: January 25, 2021 7:45 PM
Follow Us:
---Advertisement---

मुबई | भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा देत शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

 

नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय. तसेच लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी होणार असल्याचं दिसतंय.

 

पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. भाजपमध्ये गेलेले 100 टक्के लोक वापस येण्यास इच्छुक आहेत, मात्र त्या सर्वांचाच प्रवेश करून घेण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तयार नाहीत. मात्र शिवेंद्रराजेंसह काही निवडक लोकांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!