---Advertisement---

डॉ. मारुती शहाणे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड !

By team
On: February 27, 2026 11:20 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2025-26 मध्ये माध्यमिक शिक्षक गटामधून सोलापूरचे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशालेतील उपक्रमशिल पर्यवेक्षक डॉ. मारुती शहाणे यांच्या “मिस्ट्री टू मास्टरी – व्हाया सायन्स मॅजिक शोज” या नवोपक्रमाची एकूण 1070 नवोउपक्रमांमधून सर्वोत्कृष्ट नवोपक्रम म्हणून राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने निवड झाली. विज्ञान हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि पुढील शिक्षणाचा पाया रचणारा विषय आहे.

परंतु प्रत्यक्ष वर्गात पाहिले तर अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजणे कठीण जाते. प्रयोग, तत्त्वे, नियम, समीकरणे यामुळे काही मुलांमध्ये भीती आणि ताण निर्माण होतो. एखाद्या गोष्टीत “जादू” दिसली की मुलांचे लक्ष क्षणात वेधले जाते. जिथे रहस्य आहे, तिथे उत्सुकता आहे. जिथे उत्सुकता आहे, तिथे शिकण्याची प्रेरणा आहे! आणि हीच प्रेरणा विज्ञान शिकण्यामध्ये उपयुक्त ठरू शकते. जर विविध विज्ञान प्रयोगांना जादूचा वेष देऊन सादर केले तर विद्यार्थी चकित होतात, प्रश्न विचारतात आणि लगेच “हे जादू नाही, विज्ञान आहे!” हे समजून घेण्याची इच्छा निर्माण होते.यासाठी जादूच्या माध्यमाचा आधार घेऊन प्रयोगाचे अध्यापन करणे हे उद्दिष्ट ठेवून हा नवोपक्रम करण्यात आला.

नवोपक्रम स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ SCERT च्या महात्मा फुले सभागृहामध्ये मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. या वेळी आदरणीय हेमंत वसेकर ( संचालक),इब्राहिम नदाफ ( उपसंचालक ),कमला देवी आवटे ( सहसंचालक), डॉ.दत्तात्रय थिटे (संशोधन विभाग प्रमुख),ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. ह.ना.जगताप, समन्वयक सतीश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.विशेष म्हणजे याच वर्षी विज्ञान व गणितातील जादूगार, त्याच बरोबर इन्स्पायर अवॉर्ड मानक या स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर सरांच्या उपक्रमाची निवड झाली होती.

डॉ. मारुती शहाणे सरांच्या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष मा. राजेंशची पटवर्धन सर मा. मुख्याध्यापिका दीपा फाटक प्रशालेचे सर्व पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षिका यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!