ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर-विजापूर बायपासवर भीषण अपघात; कार-कंटेनर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर : वृत्तसंस्था

शहरातून धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. १३ मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रस्त्यावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांनी रोजा इफ्तार केले होते आणि त्यानंतर चहा पिण्यासाठी थोडा फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेले होते. अपघात इतका गंभीर होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धडकेचा आवाज इतका भयानक होता की आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली, आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची मोठी गर्दी जमली. परिसरातील नागरिक आणि अपघातस्थळावर उपस्थितांनी या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली, तसेच पुढील तपास सोलापूर पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!