अक्कलकोट : (प्रतिनिधी) दिवाळी – २०२६..श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळातील सेवेकरी व कर्मचाऱ्यानां दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप गुरुवारी करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी सेवेकरी व कर्मचाऱ्याचां बहुमोल वाटा आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने त्यांना फराळासाठी लागणारे किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी मंडळातील सेवेकरी व कर्मचाऱ्यानां दिवाळीच्या शुभेच्छा दिले आहेत.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सौरभ मोरे, प्रवीण घाडगे, शहाजीबापू यादव, अतिश पवार, शुभम सावंत, बाळासाहेब घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, दत्ता मोरे, किरण साठे, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, संभाजी पवार, सागर सुतार, मलंग मकानदार, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, राहुल गेजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.










