---Advertisement---

रोहित पवारांची शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी; सरकारकडे केली मोठी मागणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी कुटुंबातील दोन विधवा महिलांना साडी-चोळी भेट देत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घरात दिवाळी साजरी करण्याऐवजी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच शेतमजुरांना मदत, महिलांच्या कर्जवसुलीला दिलासा आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!