---Advertisement---

सुनंदा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर दुधनीत अंत्यसंस्कार

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी दि.३० : सोलापुर जिल्हा समता परिषदेचे माजी अध्यक्ष दुधनी आडत व भुसार व्यापारी असोशियसनचे सद्स्य मल्लिनाथ सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे पत्नी सुनंदा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील राजकिय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला त्यांच्या घरापासुन साडेतीन वाजता सुरुवात झाली. त्यांची अंत्ययात्रा गांधी चौक, सिन्नुर नाका, मैंदर्गी नाका मार्गे शेतात पोहोचली. चार दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदा म्हेत्रे यांचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. त्या ६५ वर्षांचे होत्या. त्या अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे व अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे मोठे वहिनी तर दुधनी नगर परिषदेचे स्विकृत नगरसेवक डॉ. उदय कुमार म्हेत्रे यांचे मातोश्री होते. सुनंदा म्हेत्रे यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते दुधनीकडे धाव घेतले.

या अंत्ययात्रेत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, बालाजी म्हेत्रे, आळंदचे आमदार बी.आर पाटील, सुरेश हसापुरे, अश्पाक बळोरगी, जिल्हापरिद सद्स्य मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, सातलिंग शटगार, बाबासाहेब पाटील, रामचंद्र समाणे, भीमाशंकर कापसे, शशिकांत शटगार, गफूर शेरीकर चंद्रकांत येगदी, सुभाष परमशेट्टी, राजशेखर दोषी, बसण्णा धल्लु, श्रीमंतप्पा परमशेट्टी, गुरुशांत ढंगे, गुरुशांत माड्याळ, आडत व भुसार व्यापारी असोशियेशनच्या सदस्यांसह व्यापारी, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुनंदा म्हेत्रे यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुने नातवंडे असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!