---Advertisement---

सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्यपदी मिलन कल्याणशेट्टी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. निवडीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांची
भेट घेतली त्यानंतर विद्यापीठाविषयी चर्चाही केली. कल्याणशेट्टी हे सध्या अक्कलकोट नगरपालिकेत कार्यक्षम नगरसेवक आहेत. यापूर्वी नगरसेवक म्हणून प्रभागात आणि इतरेतर तालुक्यात काम करण्याची आणि सेवेची संधी मिळालीच आहे. त्यात भर म्हणून शिक्षण क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन सोडवण्याची संधी मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे. विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी मी बांधील असेन,असे नगरसेवक मिलन कल्ल्याणशेट्टी यांनी सांगितले.निवडीबद्दल खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी,आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,शहराध्यक्ष शिवशरण जोजन
आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!