---Advertisement---

करजगीत गोंधळी समाजाच्यावतीने शिवजयंती उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

 

करजगी, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गोंधळी समाजाच्यावतीने शिव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रतिमेचे पूजन जितेंद्र अनंतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश कटारे होते. मंडळाच्या वतीने सर्व आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. किरण गवंडी यांनी शिव जयंतीच्या शुभेच्छा देऊन मंडळाचे आभार व्यक्त केले. जितेंद्र अनंतपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. युवासेना सोशल मीडिया सेल अधिकारी राज अंटद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत महाराजांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. अखिल भारतीय गोंधळी समाजाचे संचालक तिपण्णा शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, लहानपण व
आई जिजाऊ माताबद्दल माहिती दिली.महेश कटारे यांनी गोंधळी समाजाच्या सभामंडप साठी पाठपुरवा करून देण्याचे आश्वासन दिले. मुनाफ चिरके यांनी मनोगत व्यक्त करत समाजाच्या असलेल्या समस्यांचे निराकरण, सभा मंडपसाठी पाठपुरावा व मदत करण्याचे आश्वासन दिले. मंडळाचे अध्यक्ष बसवराज शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी महेश लिंबोळे, मंडळाचे अध्यक्ष बसवराज शिंदे, पवन माने,  सखाराम शिंदे , विजय शिंदे, विशाल शिंदे, अनिल शिंदे, सचिन गायकवाड, सोहेल नावदगी, नितीनकुमार होटकर, सागर होटकर, पराग शिंदे, सचिन शिंदे, काशिनाथ शिंदे , विठ्ठल शिंदे, मारुती गायकवाड, , शिवा शिवशरण, सोनू शिवशरण, संकेत वाघमारे, गणेश गायकवाड, शावरसिद्ध वाघमोडे, चंद्रकांत माने,  अंबण्णा गौडगांव, बसवराज हेळवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!