---Advertisement---

मैंदर्गी येथील रक्तदान शिबिरात 44 जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.२४ : छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त छत्रपती प्रतिष्ठान, मैंदर्गी यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मैंदर्गी नगरपरिषद सभागृहात रक्तदान शिबीराचे उद्घाटन स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रविण घाडगे सह छत्रपती प्रतिष्ठान चे सर्व सहकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबीराला ४४ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि एक सामाजिक कर्तव्य पार पाडले.

या रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिवकार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
अणदूर वरून येऊन रक्तदान केल्याबद्दल रत्नदिप बिराजदार व तोरणी वरून येऊन रक्तदान केल्याबद्दल चंद्रकांत साळुंखे या बंधू मित्रांचे विशेष आभार

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी बसवराज हिप्परगी, विनोद गोब्बूर, संजय नाशी,सुरेश नागूर, योगेश फुलारी, मल्लीनाथ गोब्बूर, सागर पेडसंगी, गिरीश काबणे, समर्थ नागूर, समर्थ फुलारी,सुरेश नागूर, सिध्दू मेंथे आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!