---Advertisement---

पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

Follow Us:
---Advertisement---

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधारकार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल ‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आले आहे. आता, पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचं सांगण्यात आले आहे. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!