---Advertisement---

दुधनी व्यापारी असोसिएशच्यावतीने सातलींगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.६ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कै. सातलींगप्पा संगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानिमित्त दुधनी येथे श्री शांतलिंगेश्वर मार्केट यार्डात आडत, भुसार, हमाल, तोलार यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पुजन व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आडत भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी बोलताना म्हणाले की, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवंगत सभापती सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण, चारित्र्यसंपन्न नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे कठीण आहे.यावेळी आडत व भुसार व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी, खजिनदार गिरमल्लप्पा सावळगी, सेक्रेटरी शिवानंद हौदे, शिवानंद माड्याळ, बसवण्णप्पा धल्लु, जगदीश माशाळ, अशोक पादी,चंद्रकांत बबलाद, चंद्रकांत भत्ता, गुरुशांत उप्पीन, दौलप्पा गुळगोंडा, येसप्पा सिन्नूर, रेवद्धसिद्ध पाटील, मल्लिनाथ येगदी, सुरेश जिवाजी, शरणप्पा संगोळगी, चंद्रकांत धल्लू, विश्वनाथ म्हेत्रे, अंबण्णा निंबाळ, प्रभुलिंग हावशेट्टी, संतोष खराडे, हमाल संघटनेचे अध्यक्ष बाबू कोळी, सुरेश बडदाळ, रायप्पा सोन्नद, राजू जेवर्गी, संगप्पा पुजारी, रवींद्र माळी, सातप्पा मानकर, तोलार संघटनेचे निंगण्णा सोळशे, नासिरजंग मोमीन यांच्यासह शांतलिंगेश्वर मार्केट यार्डात सफाई काम करणाऱ्या सर्व महिला, आडत व भुसार व्यापारी तोलार व हमाल संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!