---Advertisement---

लोकनेते ब्रम्हानंद मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी,५२ जणांनी केले रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते कै.ब्रह्मानंद मोरे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त ५२ जणांनी रक्तदान केले.यावेळी गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांना धान्य वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावर्षी कोरोना महामारीमुळे पुण्यतिथी भव्य न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मोरे प्रतिष्ठान घेतला होता.
त्यानुसार छोटेखानी कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे.ही गरज ओळखून सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले,असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.प्रारंभी कै.ब्रह्मनंद मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन लिंबाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर ह.भ.प आबा महाराज (कुरनूरकर) यांच्या हस्ते धान्य वाटप कार्यक्रम पार पडला.कोव्हिडं – १९ च्या नियमानुसार हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमोद मोरे,विनोद मोरे,राजेंद्र मोरे,महेश काळे,महेश मोरे,किशोर काळे,बाबासाहेब शिंदे,दया काळे,दादासाहेब मोरे,राम दगडे,विष्णू जाधव,गणेश मोरे,भागवत पवार,अमोल मोरे,डॉ.रणजित शिंदे,अशोक शिंदे,भास्कर काळे,रानबा काळे,सचिन दगडे,हरिदास पवार,दिगंबर मोरे,जैनुद्दीन पठाण,शिवाजी राजगुरू आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!