मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

सलग दुसऱ्यावर्षी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव भाविकांविना साजरा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि. ९ : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४३ वा पुण्यतिथी सोहळा भाविकांविना अत्यंत शांत वातावरणात पार पडला.श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोनामुळे भाविकांची गर्दी टाळण्याकरिता रद्द करण्यात आले होते.
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गांभीर्य पूर्वक काळजी म्हणून शासन व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाचे  पालन करीत मंदिर समितीने पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले आहे. मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पार्श्वभूमीवर आज पहाटे ५ वाजता श्रींची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने इंगळे यांच्या हस्ते श्रींना लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट संस्थानच्यावतीने मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर सायंकाळी अक्कलकोट शहरातून प्रतिवर्षी संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. अशा प्रकारे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झालेला श्री स्वामी समर्थांचा  १४३ व  पुण्यतिथी महोत्सव या ही वर्षी कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त वटवृक्ष मंदीरास पुणे येथील लाईट डेकोरेटर्स पुंडलिक हगवणे यांच्यावतीने मिलिंद पोकळे व सहकाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामीं चरणी अर्पण केली आहे. या प्रसंगी मंदिरात मोजक्या संख्येने उपस्थित असलेले विश्वस्त सदस्य व सेवेकऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वापरण्याची सक्ती करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, गणेश दिवाणजी, गिरीश ग्रामोपाध्ये आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment