---Advertisement---

कोरोनात मरण पावलेल्या पोलीस पाटीलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, अक्कलकोट पोलीस पाटील संघटनेचा पुढाकार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि.१७ : मिरजगी (ता.अक्कलकोट ) येथील पोलिस पाटील कै. शिवलिंग निंबाळ यांच्या कुटुंबियाना पोलिस पाटील संघाकडून संकलन झालेल्या ६२ हजार रुपयांच्या आर्थीक मदतीचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पाटील हे मागील दोन वर्षांपासून मिरजगी येथे पोलिस पाटील म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात काम करीत असताना कोरोनाचे लागण झाली होती. त्यांच्यावर सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये तब्बल २२ दिवस उपचार सुरू होते. अखेर ५ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घरी जाऊन सांत्वन केले.

कुटुंबियाची परिस्थितीची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांना कळविले होती. त्यानुसार त्यांनी लोकल ग्रुपवर आर्थिक मदतीचे आवाहन करण्यास सांगितले होते. तसे केले असता, प्रचंड प्रतिसाद मिळत केवळ चार दिवसांत तहसीलदार अंजली मरोड, पोलिस निरीक्षक विजय जाधव व काही पोलिस कर्मचारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील वृंद असे मिळून ६२ हजार रुपये संकलन झाले होते. सदर रक्कमाचे धनादेश रविवारी निंबाळ यांच्या कुटुंबियाना सुपूर्द करण्यात आले.

प्रारंभी कै.निंबाळ यांचे प्रतिमा पूजन पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद फुलारी, रहेमान अत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील महादेव बिराजदार, मळसिद्ध कांबळे, जनार्दन कुमठे, कलप्पा बंडगर, अंबणा अस्वले, संजय बिराजदार, आर आर पठाण, गेनसिध्द सुरवसे, माजी
सरपंच गोपीचंद लोंढे, बसवराज गवळी, आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!