---Advertisement---

दुधनीच्या गुरुशांतलिंगेश्वर महास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी, दि. १२ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील म.नि.प्र.लिं. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या ६२व्या पुण्यतिथीनिमित्त १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी आयोजित्त करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र.डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांनी दिली.

शनिवारी संध्याकाळी या संदर्भात दुधनी विरक्त मठात विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सद्या कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे १७ आणि १८ रोजी दुधनी आणि पंचक्रोशितील सद्भक्तांनी विरक्त मठाकडे न येता घरी राहुनच स्वमीजींचे पुजापाठ करावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.प्रारंभी माजी नगराध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी विरक्त मठाचे विश्वस्त सुभाष परमशेट्टी, सिद्धाराम येगदी, शिवानंद हौदे, सातलिंगप्पा परमशेट्टी, संतोश सोळशे, परमेश्वर पाटील, हणमंतराव पाटील, गुरुशांत ढंगे, सिद्धाराम मल्लाड व विरक्त मठाचे सचिव गुंडप्पा रामनळ्ळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!