---Advertisement---

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कुरनूर येथे उद्या रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

कुरनूर,दि.२९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची महिती उत्सव समितीचे अध्यक्ष राम शिंगटे यांनी दिली आहे.

कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवडा भासत होता.अनेक रुग्ण केवळ रक्ताअभावी मृत्यूमुखी पडले. त्याची उणीव भरून काढावी या
उद्देशाने दि.३१ ( मंगळवारी) रोजी बिरोबा मंदिर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी शिवछत्रपती सर्वोपचार रुग्णालय सोलापूर ब्लड बँकचे सहकार्य लाभणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून या मंडळातर्फे असे उपक्रम सुरू असून मिरवणुकीचा आणि डीजे सारख्या गोष्टींचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.यानिमित्त गावातील ग्रामस्थांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधीलकी जपावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!