---Advertisement---

आव्हाड यांच्या ट्विटचा अक्कलकोट अल्पसंख्याक भाजपच्यावतीने निषेध

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.८ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूर येथील दर्ग्यात दर्शन घेतलेला फोटो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या नावाने ट्विट केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट अल्पसंख्याक भाजप आघाडीच्यावतीने आव्हाड यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते मंडळी नेहमी अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान सोशल मीडियावरून टाकून सामाजिक अशांतता निर्माण करतात त्यांना धडा शिकवला पाहिजे,असे भाजप अल्पसंख्यांक शहर आघाडीचे अध्यक्ष नन्नु कोरबू यांनी सांगितले.हे आंदोलन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,
नावेद डांगे, शबाब कोरबू,सैपन मुजावर,
रशिद खिस्तके, शकील नाईकवाडी, सैपन हगालदीवटे,संजय राठोड,मोहसीन मौलवी, शकील नाईकवाडी, अब्दुल पिरजादे, मोसिन बागवान, बुडन तांबोळी,इब्राहिम बेपारी, बबलू जमादार,अजीम आतार, शाहरुख कोरबू, कैफ कोरबु, समीर शेख आदी कार्यकर्ते
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!