---Advertisement---

अन्नछत्र मंडळ आणि मंगेशकर कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध ; पंडित हृदयनाथ मंगेशकर

By team
On: July 12, 2024 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :  प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ यंदाच्या रौप्यमहोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ११ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ६.३० वा. विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू.श्री मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं.श्री अण्णू महाराज, तहसिलदार विनायक मगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त आत्माराम घाटगे, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, वे.मु.बसवराज शास्त्री तीर्थ आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘नक्षत्रांचे देणे, कार्यक्रम सादर करण्यात आला. यांच्या समवेत केतन गोडबोले, केदार परांजपे, यश भंडारे, नितीन कुलकर्णी, विशाल गुंडतवार, ऋतुराज कोरे, सोनाली श्रीखंडे यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयदेव जयदेव जय शिवराया, जय शिवराया, विश्वाचा..! जय जय स्वामी समर्थ..!, शरद सुंदर.., काय बाई सांगू .., लावण्याची झाली.. ए जिंदगी…, रजनी गंदा…,आदी मराठी व हिंदी गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. मंडळाच्या ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झाली होती.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षीरसागर, सुवर्णा घाडगे, छाया पवार, रुप पवार व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे, किशोर सिद्धे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, मनोज निकम, प्रा.शरणप्पा आचलेर, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, शीतल फुटाणे, राजु नवले, मनोज हिंगोले, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, संजय गोंडाळ, सौरभ मोरे, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, फहीम पिरजादे, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, पिंटू दोडमनी, योगेश कटारे, अभिजित लोकापुरे, प्रितेश किलजे, रणजीत गोंडाळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.

स्वामी सेवा रुजू :

भारतरत्न स्व.लतादीदी व जन्मेजयराजे भोसले यांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिलेल्या आहे. भोसले महाराजांनी वेळोवेळी दीदींच्या प्रती आपला आदर व्यक्त केलेला आहे. भोसले आणि मंगेशकर कुटुंबियांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, गुरुपोर्णिमेचे औचित्यसाधून महाराजांनी मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रथा सुरु केली. ती आज तागायत त्यांचे पुत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सुद्धा तशीच सेवा वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आपली स्वामी सेवा रुजू करतायेत यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या या स्वामी कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..!
– पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर, मुंबई

 

गुणीजन गौरव : सतीश संगोळगी (कृषी सहायक), चिदानंद उपाध्ये (पोलीस कॉन्स्टेबल), गणेश पवार (एस.टी.चालक अक्कलकोट आगर), शंकर पुकाळे (एम.एस.ई.बी) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी गौरव : तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला. शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘एक भाव मैफिल’ स्वर आर्या लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!