---Advertisement---

रुद्देवाडी येथे नंदी बसवेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट,दि. ४ : अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे नंदी बसवेश्वर यात्रे निमित्त संपूर्ण गावात बैलगाडी मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक पद्धतीने बसवेश्वरांची मूर्ती बैलगाडीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती. ही यात्रा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने रुद्देवाडी गावात साजरी केली जाते. या वर्षी देखील तितक्याच जल्लोषात यात्रा उत्साहात दिसून आली. या बैलगाडी मिरवणुकीमध्ये अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अनेक बैलगाडी जोडी सहभागी झाले होते.अनेक महिलांनी देखील या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला होता.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराजांचा पाळणा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर सकाळी नऊ वाजता बसवेश्वर महाराजांची बैलगाडी द्वारे ढोल-ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात गावात मिरवणूक काढून ग्रामस्थांना बसवेश्वराचे दर्शन दिले. बसवेश्वर महाराजांची पूजा संपन्न होऊन महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!