---Advertisement---

दसरा मेळाव्या संदर्भात मोठी बातमी.. “या” कारणामुळे दोन्ही गटानां मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली….

On: September 22, 2022 12:55 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. असे असतानाच मुंबई महानगर पालिकेने एक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे.

कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात पोलिसांचा अभिप्राय मागवण्यात आला होतं. यावर पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारली असल्याचं महानगर पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!