---Advertisement---

ब्रेकिंग..! सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व

Follow Us:
---Advertisement---

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने पहिल्या मतमोजणीत बाजी मारली आहे. विद्यामान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत हे पराभूत झाले आहेत. सावंत यांच्या पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी महाविका आघाडीचे 4 तर भाजपचे 3 उमेवार विजयी झाली. एका जागेसाठी टाय झाली. टाय झालेल्यामध्ये सतीन सावंत यांचा समावेश आहे. ईश्वर चिठ्ठीच्या सहाय्याने निकाल देण्यात आला. यावेळी सावंत यांच्या बाजुने कौल मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी 98.67 टक्के मतदान झाले होते. 981 पैकी 968 मतदारांनी हक्क बजावत 19 संचालक पदासाठी रिंगणात असलेल्या 39 उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सकाळी 9 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीत मतमोजणी सुरू झाली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!