---Advertisement---

केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी अक्कलकोट बंदची हाक, नियोजनासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि. ९ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्यावतीने ११ ऑक्टोबर रोजी केंद्रातील भाजपा सरकारच्या अन्याय जुलमी धोरण व वर्तनाविरोधात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी उद्या (रविवारी) अक्कलकोटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बंदमध्ये अक्कलकोट तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना ,काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर मित्र पक्षाचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तयारी व नियोजनासाठी दुपारी १ वाजता अक्कलकोट येथील प्रमिला पार्क काँग्रेस भवन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व अन्य नेते गण उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीला सर्व प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख आणि कॉंग्रेसचे युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!