प्रभाग क्र.१ मधील तम्मा शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरासाठी एवढ्या मोठया प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नाही. नविन बस स्थानक, मल्लिकार्जुन मंदिर रजि.ऑफीस, भुमिगत गटार, मोठी रस्ते, मोठया प्रमाणात विकास कामे चालू आहेत. अक्कलकोट शहर झपाट्याने बदलत आहे.यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, प्रभाग क्र. १ चे उमेदवार तम्मा शेळके ,सुनंदा श्रीशैल स्वामी यांना प्रचंड मताने … Read more

जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य शिवशरण जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठ व शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. १९९० पासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या … Read more

दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४ अर्ज वैध ठरले असून तब्बल ४३ अर्ज विविध उणिवांमुळे बाद झाले आहेत. या घडामोडीनंतर सर्वांचे लक्ष अंतिम उमेदवार याद्यांकडे … Read more

जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे. यावर्षीच्या नवीन गाळात हंगामाला ही सुरुवात झाली आहे .तसेच ऊस वाहतूक, तोडणी व कामगार यांची देयकेही कारखान्याने पूर्ण दिल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख … Read more

अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्यावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गाव कुमठे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसागराने आपल्या लाडक्या नेत्याला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. ‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांचे आधारवड असलेल्या सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात … Read more

अक्कलकोटचे धाडसी आणि कणखर नेतृत्व हरपले ;भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, ज्येष्ठ भाजपा नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सिद्रामप्पा मलकप्पा पाटील (वय ८८) यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या मूळ … Read more

सायकलवरून ‘गावगाथा’चा सुगंध पसरवणारा एक अवलिया – धोंडपा नंदे 

पुणे : वृत्तसंस्था पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर, मोटारींचा आवाज आणि धावपळीच्या जीवनात एक माणूस मात्र शांतपणे सायकलवरून पुढे सरकतो  त्याच्या हातात दोन दिवाळी अंक, ‘गावगाथा’चे! आणि त्या अंकांबरोबर तो पोचवतो एक सुगंध… गावाच्या मातीतला, माणुसकीचा आणि वाचनसंस्कृतीचा.      हा प्रवास आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे सुपुत्र धोंडपा नंदे यांचा जीवनातल्या संघर्षातून उभं राहिलेलं हे नाव आज प्रेरणादायी … Read more

समूह गीतगायन व वक्तृत्व स्पर्धेत शिरवळ शाळा प्रथम !

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेत समूह गीतगायन प्रकारात शिरवळ येथील जि. प. प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘या देशाचा उन्नत माथा’ या समूहगीतास प्रथम क्रमांक मिळाला.या उज्जवल यशात वैभवी स्वामी,प्रतीक्षा स्वामी,नंदिनी कोळी,सृष्टी कोकरे,शिवानी बिराजदार,तृप्ती देवकर,प्रियंका दुधभाते, भक्ती इंगळे,श्रद्धा इंगळे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ समूहगीत गायन … Read more

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारींचे निर्देश !

सोलापूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी … Read more

आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नन्नूभाई कोरबू म्हणाले, अक्कलकोटच्या वाढत्या गरजांचा वेध घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी … Read more

Don`t copy text!