मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट, पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

मुंबई : मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आली आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र, आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पकडलं आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, भविष्यात असं काही घडलं तर महाराष्ट्रात अँटीड्रोन सिस्टमही नाहीये. आंतकवादी संघटना कोणत्या प्रकारे हल्ला करतील … Read more

इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने टाकला परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर छापा, “इतक्या” कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या

कानपुर : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून रोज छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. या छाप्यात व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे मोठा घबाड सापडला आहे. पियुष जैन हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या नोटा … Read more

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले

मुंबई, दि. 22 : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड करण्यासंदर्भातही तरतूद करण्यात आली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत हे विधेयक मांडताना सांगितले. राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारास आळा बसावा यासाठी असलेल्या शक्ती … Read more

सोलापुरात जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह २९ जणांना अटक

सोलापूर :  इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब ९ येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हा हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. धाड टाकल्यावेळी … Read more

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केले आहे. तुकाराम सुपे यांना म्हाडा पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे यांना हे टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांकडून पैसे घेऊन पास केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले … Read more

श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या बटालियनवर अतिरेक्यांनी केला बेछुट गोळीबार

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले असून १२ पोलीस जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. J&K: Viral pictures … Read more

सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एक ठार – 14 जण जखमी

सोलापूर : सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अकरा मैल ते तेरा मैलच्या दरम्यान कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातामध्ये अर्चना दशरथ मरीआई वाले या २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झाले आहेत. यामध्ये सहा लहान मुले आहेत तर आठ प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. या आठ जणांपैकी सात महिला एक पुरुष आहे. जखमींमध्ये … Read more

शाळेचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढुन निवडणुक लढवल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील घटना शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढला. त्या दाखल्याच्या आधारे निवडणुक लढवून फसवणुक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारातुन हा प्रकार उघडकीस आला असून यात निवडणुक लढवलेल्या उमेदवारासह पतीविरुद्व अक्कलकोट उत्तर पोलिसात शनिवार दिनांक ४ डिसेंबर, २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यात … Read more

परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

बीड : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मंदिर संस्थानला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ५० लाखांची मागणी या पत्राद्वारे केली गेली असून पत्र पाठवणाऱ्याने आपण ड्रग्ज माफिया असल्याचे सांगितले आहे.

महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर कुरकुंभ येथील एसबीआय बँकेजवळील चौकानजिक … Read more