राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची नावे लिहून अजित पवारांच्या घराजवळील व्यापाऱ्याची आत्महत्या

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे.  प्रीतम शाह असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.  दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात … Read more

ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात ; ६ चिमुकल्यांसह १४ ठार

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज – लखनऊ महामार्गावर काल(गुरुवार) रात्री उशीरा ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  यात ६ चिमुकल्यांचा समावेश आहे. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या वर्‍हाडी मंडळीवर काळाने घाला घातल्याने, परिसरात हळहळ … Read more

दुर्दैवी ! विजेचा शॉक लागून तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

जालना : जालन्यातील पळसखेडा पिंपळे या गावी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कारण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन ३ सख्ख्या भावंडांचा विजेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. ज्ञानेश्वर जाधव (वय 28), रामेश्वर जाधव (वय 25) आणि सुनील जाधव (वय 18) असे या मृत तिन्ही भावंडांचे नाव आहे. दरम्यान, … Read more

आयपीएलमध्ये सट्टा लावल्या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

  मुंबई,दि.८ : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका औषध विक्रेत्याने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.मोबाईलच्या माध्यमातून तीन जण सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना निदर्शनास आली होती. या तिघांविरोधात पालघर पोलिसात गुन्हा दाखल झाला … Read more

राज्यात कोरोनासंदर्भात 28 कोटी 31 लाखांचा दंड वसूल

  मुंबई,दि.२७ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संदर्भात दोन लाख 69 हजार गुन्हे दाखल झाले आहेत,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख यांनी दिली आहे. यात 36 हजार 947 व्यक्तींना अटक करण्यात आली असून यात विविध गुन्ह्यासाठी 28 कोटी 31 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 239 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू … Read more

दुधनी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिषदेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुधनी येथे शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत दुधनी शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली.यासाठी तीन कर्मचारी ग्रुपच्या माध्यमातून नऊ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक कर्मचारी हे … Read more

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

मुंबई, दि. १५: सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश देत विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

कुरनूर धरण व एकरुख योजनेचे मूळ श्रेय तानवडेंनाच !

अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख  योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे स्पष्टीकरण पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी केले. उजनीच्या पाण्यावरून सध्या तालुक्यात मोठा श्रेयवाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली.यावेळी ते … Read more

स्थगिती उठविण्यासाठी २१ सप्टेंबरला अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट,दि.१५ :  अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी केला.हा बंद कोविड १९ चे सर्व नियम पाळून शांततेने यशस्वी करावे, असे आवाहन बैठकीमध्ये करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण … Read more

अक्कलकोटमध्ये आत्मनिर्भर स्वनिधी योजनेला प्रारंभ

अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांना विनातारण १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्यात येत आहेत.अक्कलकोट मध्ये हि या योजनेला सुरुवात झाली असून सोमवारी शहरातील १५ लाभार्थींना प्रत्येकी दहा हजार … Read more